Posts

Showing posts from October, 2023

अमरसिंह चंदुलाल तेजाणी

  रे डीमिक्स काॅन्क्रीट प्लांटला बदली झाल्याने मी थोडा खूष व बराच नाराज होतो. आधीची प्रोजेक्टसाईट सोडताना मी खोटकर साहेबांना विचारलंही, "माझं काही चुकलं  नाही?"  "अरे छेछे, तसं काही नाही, कंपनीला  लोकल माणूस हवा होता इतकंच" शांत मनाने मग मी प्लांटला रुजू झालो.  सिमेंट या विषयावर तेजाणी साहेबांचे दांडगे प्रभुत्व. त्यांना निवृत्तीपूर्व शेवटच्याचार वर्षात इथे पाठवण्यामागचं हेच कारण असावं. त्यांच्या केबिनच्या एसीइतकेच स्वतः साहेबही शांत,गारेगार स्वभावाचे. राग ही मौल्यवान वस्तू ते कडीकुलूपात ठेवत आणि अगदी कधी वेळ आलीच तर त्यांच्या खास शैलीत बाहेर काढत. " अरे देखो उसको रिक्वेस्ट करके, समझा तो ठीक. नहीं तो 621,311,15,66! अर्थात छेसोइक्कीस, तीनसोग्यारह,पन्द्रह छेछे. सुरवातीला मला काही कळले नाही, मग एका जुन्या स्टाफने इंग्रजीची सव्वीस अक्षरं समोर धर आणि नंबरवार लिहून पहा असा खुलासा केल्यावर मी या वल्लीला मनोमन हात जोडले! बऱ्याचदा संध्याकाळी साडेचारलाच ते निघत. "I am disgusted. Please keep my bag in the car" असं ते, भोजपुरीशिवाय अन्य भाषा न जाणणाऱ्या प्यूनला ...

मा. नी . गोगटेसाहेब

  स्था पत्य अभियांत्रिकी (म्हणजे सिव्हिल इंजिनियरिंग) चा डिप्लोमा घेऊन मी त्याकाळच्या प्रथेनुसार ४०ची टायपिंग टेस्ट आणि पासपोर्ट ही आयुधे जमवली व सरळ इराकच्या जॉबसाठी अर्ज केला.  रीतसर मुलाखतीनंतर माझ्यासारख्या अनुभवशून्य उमेदवाराला कंपनीने अंधेरीच्या साईटवर पाठवले. साईट सुरु व्हायची असल्याने मला ट्रॉmबेला जाऊन श्री. माधव नीलकंठ गोगटे अर्थात MNG यांना भेटण्यास सांगितले गेले. इंग्लंडच्या टिममधून नुकताच बाहेर आलेला प्लेअर दिसावा तसे गोगटेसाहेबांचे रुबाबदार व्यक्तिमत्व होते. उंच, गोरेपान,घारे डोळे ही अस्सल एकारांताची सर्व लक्षणेसुद्धा ठासून भरलेली. बोलताना हिंदीचा वापर अधिक. (साहेब उज्जैनचे आहेत हे मला नंतर समजले. पहिल्या भेटीतच मा.नी .गोगटे यांनी मनावर जी इस्त्री फिरवली. ती घडी आजतागायत न विस्कटता तशीच आहे.  "डिप्लोमा ला काय सब्जेक्टस होते?" "सर. कन्स्ट्रक्शन मॅनेजमेन्ट , हैड्रॉलिक्स...  पार्ल्याला कुठे राहता?  सर, हनुमान रोड " ठीक है, शेट्टीसोबत बँकेत जा. ३००० रुपये घ्या आणि जोगेश्वरीहून जी आय शीट्स. वूडन  बल्लीस वगैरे सामान घेऊन अंधेरीला जा. कलको कार्पेन्टर...
 नमस्कार मंडळी !              आ जच्या   दसऱ्याच्या सणाचे एक आगळे महत्व म्हणजे सरस्वती पूजन.                आकड्यांच्या सरस्वतीचे चित्र पाटीवर काढून तिची मनोभावे पूजा करता करता                शाळेचे दिवस मागे सरले आणि हळूहळू लक्षात येऊ लागले कि आपल्याला                आकड्यांपेक्षा अक्षरांचे आणि अर्थातच शब्दांचे आकर्षण अधिक आहे.                पुढे सिव्हिल इंजिनिअरिंग करून पस्तीसेक वर्षे साईटवर काढताना मी सतत वाचन करीत असे. तेही                       माणसांचे!               तर अशी काही वाचलेली माणसे मी आपल्यापुढे घेऊन येत आहे.  या माणसांनी माझ्यावर संस्कार केले,               जीवनाला दिशा दाखवली आणि प्रसंगी स्ट्रीट स्मार्ट कसे असावे याचे प्रशिक्षणही...