बॉब जार्डीन रॉ बर्ट जार्डीन हा वेस्ट इंडिजमधल्या बार्बाडोस येथील आमच्या स्टेडियमचा आर्किटेक्ट . स्थानिक असल्याने बेजन म्हणायचे पण मूळ आयरिश वंशाचा . गोरापान रंग , नेहमीच हाफ शर्ट इन केलेला , हसरा चेहरा हि ठळक वैशिष्ट्ये . मी पाहत असलेल्या थ्री डब्लू स्टेडियमच्या फिनिशिंग कामानिमित्ते साईटवर नेहमीच भेट व्हायची . दुसऱ्याचा वेळ फुकट जाऊ द्यायचा नाही आणि दुसऱ्यावर आपला किमती वेळ फुकट घालवायचा नाही हे तत्व अगदी काटेकोरपणे पाळणारा . साईट ऑफिसात जुजबी बोलणे झाले कि लगेच आम्ही काम पाहायला जात असू . तिथेही काही अडचण असेल तर सोल्युशन लगेच मिळे . त्याचे शिक्षण कुठे झाले होते ठाऊक नाही पण कमानकलाकाराला ( रोमन संस्कृतीत आर्च म्हणजे कमान बांधण्याच्या माहितीतून आर्किटेक्चर ...
Posts
Showing posts from March, 2024
- Get link
- X
- Other Apps
गदगडे ग दगडे हे परमेश्वराच्या निर्मितीपैकी एक अजब नमुना होते. ते मूळचे देसाई, पण कुणी पूर्वज गदग येथे सेटल झाले आणि मग हे गदगडे झाले . अर्थात हि कहाणी मला कुण्या एका सायंकाळी त्यांच्या रूमवर समजली, त्यांच्याच हातचा चहा पिताना. आमच्या टनेल प्रकल्पाचे ते भांडार अधिकारी म्हणजे स्टोर इन्चार्ज. टनेलचे काम जरी भूमिगत असले तरी त्याची सगळी दारोमदार जमिनीवरच्या स्टोरमधून मिळणाऱ्या सामानावर. साहजिकच स्टोर आणि पर्यायाने गदगड्यांची भूमिका महत्त्वाची आणि ती ते बखुबी निभावत. दोन शिफ्टमधले दोन असिस्टंट्स आणि दोन हेल्पर्स हीच त्यांची टीम. गोरापान रंग, मुळातच कमी असलेल्या उंचीला वयामुळे आलेला किंचित बाक आणि...
रफिक चौधुरी
- Get link
- X
- Other Apps
रफिक चौधुरी चौ धरी आणि चौधुरी या दोन्ही नावांची माणसे भेटली तेव्हाच मला एक पंजाबी तर दुसरे बंगाली असतात हे समजले. रफिक चौधुरी हा कन्सल्टन्टचा आर्किटेक्ट. मूळ घराणे उत्तर प्रदेशाचे , दोन पिढ्यामागे ढाक्क्याला सुखवस्तू म्हणून स्थलांतर आणि बांगलादेश होण्यापूर्वी हा बुवा जो कराचीला स्थायिक झाला तो तिथेच. त्यामुळे कधी जर इंडोपाक मॅच असेल तर TV रूम मध्ये येऊन म्हणत असे कि यार दोनो टीम मेरी हि हैं ! गोरापान रंग , कायम फुल्ल बाह्यांचा चेकर्ड शर्ट, डोक्यावर नेहमी गोल्फ टोपी आणि चेन स्मोकिंग हि ठळक वैशिष्ट्ये बंगाली , उर्दू अरेबिक आणि इंग्लिश या चारी भाषांवर प्रभुत्व असल्याने हा माणूस कुठल्याही ग्रुपात म्हणजे अर्थातच पिलिपिनो सोडून, लगेच म...
अखतर चौधरी
- Get link
- X
- Other Apps
अखतर चौधरी जॉ र्डनजवळच्या दोमा-अल -जुंदाल या हॉस्पिटल प्रोजेक्टवर मी बदली होऊन आलो. दोमा बस स्टॅण्डवर मला घ्यायला अखतर चौधरी आले होते. सहा फूट उंची, शेकहॅण्ड करताना हाताची मजबूत पकड आणि बोलताना खास पंजाबी अक्सेंट. आमचे तीन मल्लू ड्राइवर आणि स्वतः साईट मॅनेजर इफ्तिकार सोडल्यास हा एकच माणूस सौदी ड्राइविंग परवानाधारक असल्याने बऱ्याचदा राजशिष्टाचार मंत्र्याप्रमाणे नव्या स्टाफला आणण्यास जात असे! हळू हळू मला समजले कि त्यांच्याकडे काहीतरी चाळीसेक बांगलादेशी कामगार दिले होते ज्यात सुतार, स्टील फिटर , मेसन तसेच हरहुन्नरी हेल्पर असे विविध कलाकार होते आणि त्या सर्व बटालिअनला अख्तर चौधरी कडक शिस्तीत ठेवून कामे काढून घेत. तेव्हाच्या परिस्थितीनुसार आम्हाला सर्वात जवळचे रेडी मिक्स काँक्रीट प्लांट काहीतरी चाळीस किलोमीटरवर होते. एक सुदानी ते प्लांट तीन ट्रान्झिट मिक्सर्स ठेवून चालवत असे. तिथे जाऊन आपण हव्या असलेल्या काँक्रीटसाठी ग्रेडप्रमाणे रोख पैसे भरले कि दुसऱ्या दिवशी दुपारपर्यंत साईटवर काँक्रीट पोचत असे. मी पहिल्य...
गिरिश्चंद्र रामटेके
- Get link
- X
- Other Apps
गिरिश्चंद्र रामटेके जीसिआर हि असामी खरोखरच नावापुरती मराठी होती. जन्म ग्वाल्हेरचा, शिक्षण दिल्लीला आणि नोकरीचा बराच काळ सुदूर नेफा विभागात घालवलेला. त्यामुळे त्यांच्याशी संवाद बहुतेकवेळा राष्ट्रभाषेत किंवा हिंदीचा उलट पदर घेतलेल्या मराठीत होत. धिप्पाड, सहाफूट उंची, वि शेपची बॉडी , केसाचा कट आर्मी स्टाईल आणि मिशीसुद्धा रुबाबदार . म्हणजे बघताक्षणी कुणी रिटायर्ड आर्मी ऑफिसरच वाटावा. टनेलच्या कामाचा दांडगा अनुभव असल्याने त्यांना मुंबईला पाठवले होते. चार इतर साहेबांप्रमाणे फ्लॅट बीटच्या भानगडीत न पडता त्यांनी साईटवर, स्टाफ कॉलनीमध्ये राहणे पसंद केले होते. सोबत सौ रामटेके आणि दोन पाठोपाठच्या लहानग्या मुली. कामाच्या बाबतीत वाघ असलेले रामटेके साहेब आपल्या सबॉर्डिनेटसाठी मात्र कुटुंबप्रमुखासारखे. पण त्यातही वडिलांच्या शिस्तीला आईची माया जरा ओव्हरटेक करीत असे. टनेलच्या चोवीसतास कामाच्या संकेतात काँक्रीट होऊन बॉल पास केला ती वेळ महत्वाची असे. याच वेळेपासून पुढचे सायकल सुरु होई. साहजिकच शिफ्टला आल्यावर आधी गेटवरतीच बॉल कभी पास हुआ असे कुणाला तरी विचारले कि मग पुढ...