दिलावरमामा दि लावरखान हा पठाण. त्याच्यासोबत आणखी वीसेक पठाण असलेला त्याचा मोठा लेबर फोर्स हा आमच्या जॉर्डन सीमेलगतच्या हॉस्पिटल प्रोजेक्टवर एचव्हीएसी काम करणाऱ्या एजन्सीकडे होता. साधारण जोहरच्या प्रार्थनेपर्यंत त्यांचा कामाचा दिवस असायचा. अलबत त्यानंतर तो आमच्यासाठी हातमेहनत करायला मोकळा असे या देहाडीच्या म्हणजे अधिकच्या कमाईमुळे तो साईट मॅनेजर आणि स्टोरकिपर यांच्या फोनवर आपली फौज घेऊन धाव येई. जंजीर सिनेमातल्या प्राणला अचानक फुगवला आणि साहजिकच उंची कमी केली कि जसा दिसावा तसा हुबेहूब दिलावरखान दिसायचा. दाढी मात्र केसांना मॅच करणारी शुभ्र रुपेरी. नो मेंदी व इतर काही. बहुतेकदा त्याचे कपडेसुद्धा या सर्फ सफेद केसांसारखेच असत. पश्तू ढंगाने उर्दू बोलताना त्याचे दा दा (होय होय ) ऐकायला नादमधुर वाटे. फुल्ल बाह्यांच्या खमीजखाली लोम्बणाऱ्या नाडीला बांधून ठेवणारा एक मण्याची मला सुरवातीला गम्मत वाटायची पण हळूहळू लक्षात आले कि हा त्यांच्या पेहेरावाची खासियत आहे. दमामहुन ट्रेलरने आलेले टाइल्सचे बॉक्सेस असो वा इ...
Posts
- Get link
- X
- Other Apps
आर वेलू मू र्ती लहान पण कीर्ती महान ही म्हण ज्या व्यक्तींवरून तयार झाली असेल त्यातील अग्रेसर म्हणजे राघवेंद्र वेलुस्वामी , साईटवर आणि कंपनीत फेमस असलेला कार्पेन्टरी फोरमन आर वेलू. कमी उंचीमुळे त्याला साईटवरच्या पाईप परांचीखालुन लीलया वावरत येत असे. साधारण ठेंगू माणसांमध्ये ठळक दिसणारा गुण म्हणजे मान वर करून बोलणे ज्यात थोडी उर्मटपणाची झाक असते , तो वेलूमध्ये क्वचितच दिसे. कार्पेन्टरी शेडमध्ये...
- Get link
- X
- Other Apps
वासू वा सू म्हणजे वासुदेव मोहंती. जोगेश्वरीच्या क्रीडा संकुलाच्या कामावर माझ्यामागून आलेला हा दुसरा माणूस. म्हणायला लेबरच पण शार्प डोक्याचा होता. साईटवर कामासाठी येताना तो वर हाफ बुशशर्ट आणि खाली ढोपरापर्यंत गुंडाळलेली निळ्या रंगाची टीपीकल ओडिया खसरा लुंगी लावत असे. केस वाढले कि डोकेदुखी होत असल्याने त्याचे डोके नेहमीच क्रू कट दिसायचे. त्यावेळी आमची साईट म्हणजे एक मोठा खड्डा होता आणि त्यात पावसाचे पाणी साठल्यावर तर गच्च पानवेलींचे जाळे पसरलेले असे. पाणी जास्त खोल नसले तरी गमबूट घालून चालावे लागे. अशा किचकट जागी वासू माझ्यासोबत लेव्हल्स घेण्यासाठी लेवलिंग स्टाफ घेऊन उभा राही. मातीचा भराव टाकण्यापूर्वी घ्याव्या लागणाऱ्या या लेव्हल्स साठी त्याला सक्त ऑर्डर होती कि स्टाफ चांगला दाबून धरायचा आणि हे काम तो इमाने इतबारे करीत असे. अगदी क्लायंटकडून चेकिंग होत असताना दूर उभा असलेला वासू स्टाफ जमिनीत खोवून धरताना दात ओठ खात जो चेहरा करायचा तो मला टेलेस्कोपमधून दाखवत क्लायन्टने पावतीसुद्धा दिली होती कि तुम्ही सर्वे हेल्परला ट्रेनिंग चांगलेच दिल...
- Get link
- X
- Other Apps
एमजीआर के वळ महिनाभराच्या संपर्काने माणूस लक्षात राहतो ? एमजीआर हे संक्षिप्त नाव. पूर्ण नाव काय असेल याचा विचार करण्याची वेळच आली नाही. अर्थात तुम्हाला वाटते तो दक्षिणेतला चित्रपट गाजवणारा एमजीएआर नव्हे, तर हि व्यक्ती म्हणजे एक सरकारी ठेकेदार. माझ्या कुठल्याही बायोडेटात न आलेल्या कंपनीचा सर्वेसर्वा. पूर्ण एक महिना साईटवर काम करून (खरे तर एकवीस दिवस !) ती सोडण्याचा अनुभव मला देणारा माझा पहिला एम्प्लॉयर. झाले असे कि डिप्लोमा हासील केल्यावर कामाच्या शोधात असताना, एका ओळखीतून मला हि साईट मिळाली. उपनगरातल्या एका स्विमिंग पुलाचे आणि त्या संबंधित संकुलाचे काम होते ते. एका संध्याकाळी उशिरा गोवंडीला मी त्या साईटवर गेलो आणि आमच्य...
- Get link
- X
- Other Apps
बॉब जार्डीन रॉ बर्ट जार्डीन हा वेस्ट इंडिजमधल्या बार्बाडोस येथील आमच्या स्टेडियमचा आर्किटेक्ट . स्थानिक असल्याने बेजन म्हणायचे पण मूळ आयरिश वंशाचा . गोरापान रंग , नेहमीच हाफ शर्ट इन केलेला , हसरा चेहरा हि ठळक वैशिष्ट्ये . मी पाहत असलेल्या थ्री डब्लू स्टेडियमच्या फिनिशिंग कामानिमित्ते साईटवर नेहमीच भेट व्हायची . दुसऱ्याचा वेळ फुकट जाऊ द्यायचा नाही आणि दुसऱ्यावर आपला किमती वेळ फुकट घालवायचा नाही हे तत्व अगदी काटेकोरपणे पाळणारा . साईट ऑफिसात जुजबी बोलणे झाले कि लगेच आम्ही काम पाहायला जात असू . तिथेही काही अडचण असेल तर सोल्युशन लगेच मिळे . त्याचे शिक्षण कुठे झाले होते ठाऊक नाही पण कमानकलाकाराला ( रोमन संस्कृतीत आर्च म्हणजे कमान बांधण्याच्या माहितीतून आर्किटेक्चर ...