Posts

Showing posts from February, 2024

महर्षी रेमेडीओस

                                                               महर्षी  रेमेडीओस  ज न्म झिम्बाबवे चा.  शिक्षण आणि प्रत्यक्ष अनुभव लंडनला.  गोवा मुक्तिवेळी गोव्यात परतून पुढे भारतातच वास्तव्य. ध्येय- चांगले सिव्हिल इंजिनिअर घडवणे.  या अजब रसायनाचे नाव ए.पी रेमेडीओस , आजतागायत मला त्यांच्या ए. पी. या अद्याक्षरांचा अर्थ ठाऊक नाही, तशी कधी गरजही पडली नाही.  साधारणपणे तीन वर्षांचा डिप्लोमा आणि चार वर्षांचा डिग्री कोर्स असताना , त्यांचे स्वतःचे असे एक सिलॅबस होते जिथे सहा वर्षे रगडल्यानंतरच विद्यार्थी सिव्हिल इंजिनियर म्हणवून घेण्याइतपत शिकायचा. हो, पण या सहा वर्षात त्याला इतके थेअरी आणि प्रत्यक्ष सुद्धा ज्ञान मिळे कि त्याच्यानंतर त्याला साईटवर कुणीही कधीही कोणत्या...

पारशी तिथे सरशी

       पारशी तिथे सरशी  मा झ्या सुदैवाने माझा जन्म झाला ती जागा म्हणजे वाडिया स्ट्रीट,ताडदेव हा तद्दन पारशी लोकॅलिटीचा भाग पण चार वर्षांचा असताना विलेपार्ल्याला स्थलांतर केल्यापासुन  अगदी औषधालाही पारशी न सापडले नाहीत. ती कसर भरून काढली  मला आयुष्याच्या  विविध टप्प्यांवर भेटलेल्या पारसी बावांनी! रे रोडला ब्रिटानिया बिस्कीट फॅक्टरीत बाबांचा हात धरून  ख्रिसमसला जाताना,हारबर ट्रेनच्या प्रवासाइतकेच कुतूहल असे ते दरवर्षी उत्साहाने सान्ताक्लॉस बनलेल्या डॉ गमाडियांचे. म्हणायला ते कंपनीत डॉक्टर होते, पण एकदा का तो खास लालेलाल झगा चढवला आणि एरवीच्या तुळतुळीत गालावर पांढरी शुभ्र दाढी चिकटवली कि ते खरोखरीचे संताबाबा होऊन जात.पुढे  कळायला लागेपर्यंत सांताक्लॉजला चष्मा असतो असाच माझा समज होता. जात्या वर्षागणिक डॉ गमाडियांचा संता थोडा स्थूल आणि जरासा झुकलेला दिसू लागला होता पण उत्साहात तसूभरही कमीपणाचा शिरकाव नव्हता. सगळ्या मुलांबरोबर शेकहॅण्ड करीत,मधेच पॅकिंगवlल्या कुण्या सॅन्ड्रा फ्रॉम बांद्रा ला डोळा मारत हलकेच गालावर किस करणे असा हा संता !  R...

गुरवे नम:

गुरवे नमः   गु रुचरीत्रात सांगितल्याप्रमाणे जीवनात  गुरु कोणत्याही रूपात येतो. माझ्यासाठी  तो  अल्फ्रेड च्या रूपात आलाय. आल्फ्रेड म्हणजे अल्फ्रेड फ्रान्सिस कार्व्हालो   मी कधी त्याला मिस्टर कार्व्हालो  म्हणत नाही आणि तो  मला विकास म्हणत नाही. आमची पहिली भेट झाली ती जवळ जवळ एक तपापूर्वी. कंपनीने एका  १०३ मजल्याच्या  कमर्शिअल टॉवर चे काम हाती घेतले त्या प्रोजेक्टवर.  जगभरची अनुभवी माणसे हायर करताना अल्फ्रेडची निवड दुबईहून करण्यात आलेली. नाव ऐकून हा कुणीतरी दुबईकर गोंयकार असावा अशी मजबूत फुटबॉल प्लेयरसारखी प्रतिमा मनात असताना हा समोर आला. वय,उंची यात माझ्याहून बऱ्यापैकी कमी पण अनुभव म्हटला तर दुबैतच २५ वर्षे काढलेली, तीही पूर्णपणे क्वालिटी पोर्टफोलिओ जबाबदारीने सांभाळत. बरे हा मूळ मुंबईकर म्हणजे इतका मूळ कि एकदा बोलता बोलता सहज म्हणून गेला कि My forefathers were from this very soil  and coast of Mumbai ! मराठी बोलताना व्यवस्थित इष्ट इंडियन आकसेंट ने बोलणार!  इतक्या मोठ्या प्रोजेक्टचे docum...
                                                                हाली मूर  मा झ्याकडे असलेल्या थ्री डब्लू स्टँडच्या बांधकामातील पोलादी सळ्यांचे काम करणारा लोकल बेजन ठेकेदार. वय सत्तरीच्या पुढेच, रंग तो हाताळत असलेल्या  लोखंडाशी नातं सांगणारा, भरपूर उन्हात रापलेला. एकही दात शिल्लक नसलेला हाली बोलताना, खास करून हसताना बऱ्याचदा उगाच बापू (सिनिअर) यांची आठवण करून देत असे. हो, डोक्यावरची कापडी हॅट आणि कायम सैल पॅन्टीत खोचलेला शर्ट सोडल्यास.  आपल्या जवानीत म्हणे तो नावाजलेला क्रिकेट समालोचक म्हणजे कॉमेंट्रेटर होता. पुढे काही कारणास्तव त्याला माईक ऐवजी खर्चाला तोंड द्यावे लागले आणि तो या फिल्ड मध्ये आला. तसे पाहिल्यास बार्बाडोसमध्ये प्रत्येकजण हा या ना त्या प्रकारे क्रिकेटशी ...