Posts

Showing posts from December, 2023

स्प्रिंग हायवेचा भिकारी आणि क्रिस्टल

                                  स्प्रिंग हायवेचा भिकारी आणि क्रिस्टल    बा र्बाडोसमधल्या वास्तव्यात संध्याकाळी स्प्रिंग हायवेच्या कडेने चालत जाऊन टेकडीवरच्या आमच्या जॉर्डन व्हिलामध्ये परतणे हा एक चांगला व्यायाम असे आणि तो मी न टाळता आणि कंटाळता करीत असे. जाताना उजव्या हाताचा समुद्रकिनारा आणि सूर्यास्ताचे सोनेरी आकाश  येईपर्यंत काळोखात बुडालेले असायचे, बिचवरच्या हॉटेलचे लाईट्स सोडता. तर डावीकडे आणखी हॉटेल्स, एक दोन शॉपिंग मॉल्स, मधेच वर जात गायब होणाऱ्या  छोट्या गल्ल्या आणि  या दोघांमध्ये  अंगावर दिमाखातल्या गाड्या फिरवत असलेला स्प्रिंग हावे हा मुख्य रस्ता.  माझ्यासारखे अनेक हेल्थफ्रिक्स अर्थात पुरुष व बायाही असा वॉक घेताना दिसायचे. काही ओळखीच्या चेहऱ्यांची स्मितहास्याने देवाणघेवाण व्हायची.  अशाच एका संध्याकाळी, स्प्रिंगफिल्ड गॅस बंक (पेट्रोल पंप)च्या पुढे मी पोचलो असता अचानक एकजण समोर आला. "गुड इव्हनिंग सर! हाव आर यु थिस इव्हीनिंग?"  अंगापिंडाने मजबूत, रंगी...

मला भेटलेले जापनीज

     मला भेटलेले जापनीज    सौ दी अरेबियामधील सिमेंट प्लॅन्ट एक्सटेन्शनचे पूर्ण स्थापत्य काम आम्ही करीत असलो तरी आमचे क्लायंट एक जपानी कंपनी होती.  अर्थात साईटवर त्यांचा  अगदी मोजकाच स्टाफ मौजूद असे. त्यात काही भारतीय , गोरे आणि जपानी होते. त्यातही खास लक्षात राहिलेले दोघे.  एक त्यांचा प्रोजेक्ट मॅनेजर हाताकामा आणि दुसरा गुणवत्ता अधिकारी यामागूची. जपानी पद्धतीप्रमाणे साहेब म्हणायचे तर हाताकामा सान आणि यामागूची सान .  जपान्यांमध्ये दोन प्रकारच्या शरीरयष्टीचे लोक दिसत. एक सुमोच्या जवळचे खाते पिते घरके आणि दुसरे कडकोळ!  आश्चर्याची गोष्ट म्हणजे दोन्ही प्रकारचे कमालीची शारीरिक मेहनत करताना दिसत. हाताकामा किंवा सोयीसाठी आपण H -Saan म्हणू त्यांना, ते पहिल्या गटातले.  जपानी  शिस्तीची पहिली झलक हि कि साईटवरच्या सर्वाना गणवेश, तोसुद्धा सारखा. त्यात मग काही जण ओव्हरकोट ऐवजी इन करणारे असत इतकाच. H -Saan ना इन करणे जमणारे नसल्याने सैल बाह्यांचा ओव्हरकोट , त्याला वर दोन, खाली दोन खिसे अशा वेशात सकाळी ९ पासून कधीही , आणि सैरभर कुठेही ते दिसत. ...

माझे भूमीगत दिवस

         माझे   भूमीगत दिवस  हि गोष्ट  १९८८ सालातली . बोगदा म्हणजे टनेल म्हटल्यावर मला तरी रेल्वेप्रवासातले कमी अंतराचे बोगदेच माहित होते. अशात मुंबईत आणि तेही महालक्ष्मी रेसकोर्स सारख्या जागी एक टनेल होतोय हे नवलच.  बरे यासाठी पहिल्यांदाच ड्रिल ब्लास्ट पद्धतीऐवजी TBM म्हणजे टनेल बोरिंग मशीनचा वापर केला गेला होता. आम्ही हि साईट पाहायला गेलो तेव्हा जमिनीखाली पन्नास मीटर खोलीवर एक भुयार खणले जात आहे , काळ्या कातळाच्या थरात , त्या कातळाचा हिरे लावलेल्या कटिंग हेड्सनी चुरा करून तो मक (चिखल) मोनोरेलवरून वाघिणींद्वारे मागे आणला जातोय , आणि हे सर्व करणारी माणसे तिन्ही शिफ्टमध्ये अविरत काम करताहेत हे सारेच अद्भुत होते.  या प्रकल्पावर माझी ट्रान्सफर झाली तेव्हा टनेलचे खोदकाम पूर्ण  झाले होते आणि आतून काँक्रीट लाइनिंग सुरु करायचे होते. घोड्याच्या नालाच्या आकाराचा बोगदा हा आपण नेहमी गाडी बोगद्यात शिरली कि पाहतो तो. हा टनेल मात्र पूर्ण गोलाकार ! मग त्याला साधारणपणे एक फूट जाडीचे काँक्रीट आवरण द्यायचे. त्यासाठी उलट्या दिशेकडून सुरवात ...
                                                             अनस्किल लेबर  सा ईटवरच्या माझ्या पहिल्या दिवसापासुन ते अगदी निवृत्तीच्या दिवसापर्यंत सातत्याने जे विविध रूपात  दिसत आले ते हे अनस्किल लेबर .  कोणताही ठराविक हुनर नसणे पण सेतू बांधताना महत्वाचा खारीचा वाटा उचलणे हे यांचे वैशिष्ट्य, पूर्वी म्हणजे जेव्हा झारखंड हे राज्य नव्हते तेव्हा झारखंडी आदिवासी हे भारतभरच्या बांधकाम प्रकल्पांवर प्रचंड प्रमाणात कामासाठी आणले जात. तीच गत ओडिशा (तेव्हा ओरिसा) च्या उडिया लेबोरची.  रांची कामगार पुरवणारा एक मोठा सप्लायर होता. त्याचे मेट (सुपरवाईझर) हे कामगारातून  पुढे आले असल्याने त्यांना सर्व कामांची बऱ्यापैकी माहिती असे.  गावच्या मुखियाला ठराविक रक्कम देऊन मग हे रांची आदिवासी  दूर पल्ल्याच्या ट्रेनमधून बिहार मध्यप्रदेश गुजराथ करत मुंबईला आणले जात. यात स्त्रिया सुद्धा असायचं ज्यांना रेजा म्हटले जाई . ऐकलेल्या ...