Posts

Showing posts from November, 2023

झुबेर कुट्टी

  सौ दी अरेबियात लॅन्ड झाल्यावर एक रात्र रियाध गेस्ट हाऊसमध्ये काढून दुसऱ्याच दिवशी अर् रफा या हॉस्पिटल प्रॉजेक्ट साईटला माझी रवानगी झाली. माझ्याकडे जे एक्सटर्नल वर्क्सचे काम होते त्याचे पॅकेज एका स्थानिक अरब कंपनीला दिले होते आणि त्यांचा साईट मॅनेजर झुबेर कुट्टी. या वल्लीला पाहताच माझा, इतर स्टाफहून कमी असलेला उंचीचा न्यूनगंड दूर झाला. मी त्याच्या नजरेला नजर देऊ शकत नव्हतो कारण त्याची नजर माझ्या खांद्यावर पोचत नव्हती. तिथल्या शिरसूत्यानुसार झुबेरने मला त्याच्या किया गाडीतून साईटवर फिरवले. (गाडीबाबत) डावंउजवं कळण्याइतका निर्ढावला नसल्याने बऱ्याचदा, गाडी थांबवून गाडीत परतताना मी त्याला इंजिन बंद करायला सुचवले कि "सातंसाब, This is no India. यहां कोई बारबार इंजिन ओफ नहीं करता.शुअर!" असे उत्तर मिळे.झुबेरच्या या शुअरची मला पुढे सवय झाली. म्हंजे एखादवेळेस, द्विधा मनःस्थितीतही तो "वल्लाही, क्या करना, नहीं समझता, शुअर!" असे म्हणायला कमी करत नसे. घरी पाठवायला पहिले सौदी पोस्टचे पत्र घेऊन आम्ही साईटसमोरच्या पोस्टात गेलो. किती स्टॅम्प लावायचे विचारून 6 रियाल ऐकल्यावर मी एक 5...

बार्बाडोसचा जाॅर्ज

  बा र्बाडोसचा जाॅर्ज बार्बाडोसला वर्षभर राहूनही जाॅर्ज या वल्लीचे पूर्ण नाव काय, हे मला कधीच कळले नाही; मुळात तसा शोध घ्यायची गरजही वाटली नाही. सहा फूट उंची, एफ्रो वंशाचे प्रमुख लक्षण असलेले टिपीकल केस आणि पोलादी सावली सलोनी कांती! थोडंसं अनुनासिक पण रॅप केल्यासारखं बोलणं ज्यात 'ह' चा उच्चार खरोखर महाप्राण वाटे (जसे कि वे-हि-कल)  केन्सिंग्टन ओवलच्या कामासाठी आम्ही त्याच्या जाॅर्ज इम्पोर्ट ऍन्ड एक्स्पोर्ट कंपनीकडून गाड्या व ड्रायवर्स (त्याच्यासकट) घेतले होते. होते म्हणताना, जाॅर्ज, एल्विन, एडवर्ड बरोबरच मार्गारेट आणि इवा या चालिकाही होत्या! स्त्रियांनी गाडी चालवायला (तेव्हां) बंदी असलेल्या सौदी अरेबियातून डायरेक्ट ट्रान्सफरवर आलेल्या माझ्यासारख्याला पोस्टवूमन, हवालदारीण, व ड्रायवर स्त्रियाच मुबलक असणारा बार्बाडोस म्हणजे एक सांस्कृतिक धक्का होता! तर हा जाॅर्ज जुना पोलिस अधिकारी. भरपूर ओळखी आणि उत्तम ड्रायविंग. Pynes (पाईन्स) चे गेस्ट हाऊस सोडून,दोन डोंगर पार करून समुद्राला समांतर रस्त्याला कधी लागलो हे जॉर्ज स्टीअरींगवर असला कि कळतही नसे. एकदा साईटवरून परतताना गाडीत काहीतरी विन...

वाचलेली माणसं -इकबाल कुट्टी

  स सी कुट्टी, जोई कुट्टी आणि इक्बाल कुट्टी हे तिघेही भेटल्यावर एकमेकांशी मल्याळम(च) बोलतात. दोन मराठी माणसं मात्र मराठीत बोलायचं टाळतात.  जॉर्डन सीमेलगतच्या दोमा-अल-जुंदाल इथल्या हाॅस्पिटल प्राॅजेक्टवरचा आमचा अन्नदाता म्हणजे कुक- इक्बाल कुट्टी. मी पुनर्जन्म मानत नाही ,पण महाभारताला ज्ञात नसणारा द्रौपदीचा भाऊ म्हणजे इक्बालच आणि तो बहिणीची अक्षय थाळीही घेऊन जन्माला आला असावा. आमचा डायनिंग हॉल म्हणजे इंग्रजी C आकारात जोडलेली 3 मोठी टेबल्स. नॉनवेजची चर्चा चालली असतानाही दूर पळणाऱ्या राजनपासून सुरुवात होई. मग फक्त अंडं खाणारे, नंतर आमच्यासारखे ज्यांना उडणारं आणि धावणारं (शिंगवर्गी सोडून) चालायचं ते, मग आमच्याबरोबरचे पण जलचरांवरसुद्धा ताव मारणारे आणि last but not the least असे तिघे ज्यांना काहिही खाणं वर्ज्य नव्हतं! आता इतक्या प्रकारच्या जीभा व पोटांचे चोचले पुरवणं ही काय खायची गोष्ट? (ही कोटी नाहीए) पण इक्बाल हे सारं लीलया आणि तेही हसतमुखाने करायचा! माझ्याबद्दल त्याला आदर होता तो, चवीचे जास्त नखरे न करता, उलट कधी छान झालंय म्हणत एखाद्या dish ची रेसिपी विचारणारा म्हणून.  एकदा...