Posts

Showing posts from January, 2024
                                                             सरकार माझ्या दारी  ना ही, याचा त्या सरकारी योजनेशी काहीही संबंध नाही.सरकार म्हणजे अमलेंदू सरकार, KNP फौंडेशन्स कंपनीचा पायलिंग इंजिनियर . काळी रापलेली कांती असलेला धिप्पाड देह, जवळजवळ 10 तास डोळ्यावर काळा गॉगल आणि इतर काही खात नसताना सतत सिगरेट खाणे ! साईटवर बऱ्यापैकी पायलिंग झाल्याने आता लोड टेस्टिंग करणे अनिवार्य होते. त्यामुळे संपूर्ण जुगाड केला गेला आणि एका रात्री टेस्टिंगला सुरवात झाली. तासातासाने रिडींग घ्यायचे असल्याने साहजिकच मग मला थांबणे भाग पडले .  मी तसा पहिलटकर होतो त्यामुळे पाईल खचते म्हणजे नक्की काय होते, गेजचा पॉईंटर किती सरकतो वगैरे जाम कुतूहल होते जे पहिल्या दोनतीन रिडींगमधेच शमले.  तेव्हा पोर्टाकेबिन वगैरे नसल्याने एक जाड कॅनव्हासचा तंबू हाच आमचा आसरा होता. रात्रभर जागण्याच्या तयारीने मी घरून जेवून आलो होतो. सरकारने आसपास चांगले माछ मिळ...
     माखन प्रसाद  मा खन प्रसाद त्याचे नाव देवनागरीत लिहू शकत नव्हता. त्यामुळे तो  MAKAN PERSAUD  असेच लिहायचा.त्याचे बहुतेक खापर पणजोबा बिहार किंवा उत्तर प्रदेशातून उसाच्या लागवडीसाठी मजूर म्हणून वेस्ट इंडिजला आणले गेले होते. सफाईदार इंग्लिश, बऱ्यापैकी पोर्तुगीज यापलीकडे त्याला दुसरी भाषा अवगत नसावी.  जॅक ऑफ ऑल ट्रेंड्स अँड मास्टर ऑफ एकतरी असा हा नमुना.  जन्मतः मिळालेले तोकडे हात त्याने अचाट बुद्धीने मोठे केले होते. प्रथमदर्शनी मला त्याचे वेगळेपण हे जाणवले कि त्याच्या सेफ्टी हेल्मेटवर समोरच स्वस्तिक रंगवले होते आणि त्याबाजूला ओम .  मॅक्स लंबर या महादेव प्रसादच्या बांधकाम कंपनीत माखन काम करीत असे. दशावतार नाटकमंडळीत भीमापासून द्रौपदीपर्यंत सर्व भूमिका पाठांतरासहित उत्तम  वठवणाऱ्या अभिनेत्याचे कौशल्य त्याच्या अंगी होते. कधी तो कार्पेन्टर म्हणून काम करताना दिसे, कधी मेसनसोबत बांधकामात असे तर कधी आणखी काही.  एखाद्या स्लॅबचे काँक्रीट होत असताना हा बऱ्याचदा गायब व्हायचा  कामाच्या ओघात मीही विसरून जायचो.  एकदा स्लॅब झाल्यावर आम्ह...

पिनॉय पीपल

                                                  पिनॉय पीपल  न मनाला बॅरेलभर तेल घालण्यापूर्वी हे clear करतो कि पिनॉय म्हणजे फिलिपाईनी पुरुष. बायांना पिलीपिना म्हणतात . हिंदुस्थानावर ब्रिटिशांनी राज्य केले त्यामुळे आपण येस फेस  करायला शिकलो, फिलिपाइन्स बरीच वर्षे स्पॅनिश अमलाखाली राहिल्याने जागोजागी रेमुंडो, अलबेर्टो किंवा मार्गारिटा , मेनूका अशी नावे असणारे कोमस्तका बोलणारे हमखास आढळतात.  सौदी अरेबियातल्या आमच्या हॉस्पिटल साईटवर बरेचसे पिनॉय होते आणि जुन्या हॉस्पिटलात पिलीपिना परिचारिका असायच्या.  मी साईटला रुजू झाल्यावर सर्वात आधी दोन महिने एका मोठ्या पोर्तकेबिनमध्ये रोमिओ रेमुंडो या इलेक्ट्रिकल इंजिनियरसोबत राहत असे. याने बरीच वर्षे सौदीत काढलेली आणि हालचालीप्रमाणे निदान 40 पुढचा तरी वाटायचा. एक तर जितके पिनॉय मी पाहिले त्यात एकालाह...

तीन मंहमद

                                         तीन  मंहमद हे  तीन महंमद मला दोमा अल जुंदाल या जॉर्डनसीमेजवळच्या  हॉस्पिटल साईटवर भेटले.  महंमद बुध्दा (याला आम्ही खाजगीतच बुद्धा म्हणजे म्हातारा म्हणायचो) हा मिनिस्ट्री ऑफ हेल्थ अर्थात  आमचे क्लायंट यांच्यातर्फे साईटवर ठेवलेला मॅनेजर . हा स्वतः आर्किटेक्ट होता.  पहिल्याच दिवशी  याची ओळख करण्यासाठी मला आमच्या साईट मॅनेजरसोबत यांच्याकडे गेलो.  सलाम अलैकूम झाल्यावर  सो व्हाय यु हिअर या इश्तियाक ?  थिस इज अवर न्यू  इंजिनिअर साटम  सद्दाम ? वल्लाही , गुड नेम. हि स्पिक युवर लँग्वेज? नो (कारण इश्तियाक तेलगू बोलणारा) ताल या मुरली (हा मेकॅनिकल इंजिनियर, तामिळ बोलणारा, त्याला बोलावले ) हि स्पिक युवर लँग्वेज? No सो हि स्पिकिंग लाईक  गनी ? (हा त्यांचा सिविल स्टाफ, बिहारी बाबू) न राहवून मी बोललो  सर माय मदर टंग मराठी लेकिन आना कलाम अरेबिक, श्वाय श्वाय (माझी मातृभाषा मराठी आहे पण मी हळूहळ...